आधार कार्ड ला पैन कार्ड लिंक करण्या साठी सामान्य ना त्रास देवू नए,केंद्र सरकार ने फेर विचार करावा;शौकत मुकदम
आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सामान्यांना वेठीस धरु नये, केंद्र सरकारने फेरविचार करावा: शौकत मुकादम
प्रतिनिधी
केंद्र सरकारने आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासाठी आता ३० जून ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. परंतु यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. त्यांना नाहक भुर्दंड दिला जात आहे हे अयोग्य असून केंद्र सरकारने याचा फेरविचार करावा, अशी मागणी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
आधारकार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च ही डेडलाईन ठरवली होती, परंतु तांत्रिकदृष्ट्या हे शक्य न झाल्याने खेड्यापाड्यातील अनेक नागरिक आधारला पॅन कार्ड लिंक करण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे केंद्र सरकारने ही मुदत वाढवून आता 30 जून ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. यासाठी शासनाने एक हजार रुपये दंड लागतो आहे.
जर 30
जून नंतर आधार कार्ड हे पॅनकार्डला लिंक करण्यात आले तर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ही दंडाची रक्कमही मोठी आहे. केंद्र सरकारने हा अट्टाहास कायम ठेवला, तर सध्या महागाईने होरपळणा-या सर्वसामान्य नागरिकाला जगणे अवघड होणार आहे.