धोकेबाज़ ‘गर्लफ्रेंड’ने धोका दिल्याने प्रियकर विद्यार्थ्या ची आत्महत्या !
बीड – जिच्यावर जिवापाढ प्रेम केले तिनेच धोका देत दुसरा बॉयफे्रंड शोधला.
वारंवार समजून सांगितल्यानंतरही बदल झाला नाही.
अखेर १९ वर्षीय प्रियकरानेच गळफास घेऊन या प्रेमकथेला पूर्णविराम दिला.
ही घटना बीड शहरातील आदित्य महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये काल सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नरेन नानासाहू लोखंडे (१९ रा.रांजनगाव जि.पुणे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेला माहितीनूसार, मागील दोन वर्षापूर्वीच तो शिक्षणासाठी बीडमध्ये आला.
आदित्य महाविद्यालयात तो बी.फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.
खेळात टॉप असलेला नरेन अभ्यासातही खुप हुशार होता.
वर्षभर बीडमध्ये स्थिरावल्यानंतर त्याचे आपल्याच महाविद्यालयातील एका मुलीसोबत सुत जुळले. काही दिवस दोघांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले.
मात्र मागील काही दिवसांपासून तिने याला टाळणे सुरू केले.
आपल्याला सोडून दुसऱ्या मुलासोबत तिचे सुत जुळल्याचे नरेनला समजले.
त्याने अनेकवेळा तिला समजावले. मात्र फरक पडला नाही.
बुधवारीही त्यांच्यात यावरून संवाद झाला होता. मात्र तोडगा निघाला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
या सर्व प्रकारामुळे तो तणावाखाली होता. गुरूवारी दसरा असल्याने महाविद्यालयाला सुट्टी होती. सर्व विद्यार्थी बाहेर गेले होते.
हॉस्टेलमधील काही मुले जेवणासाठी जाताच एकटा असल्याची संधी साधून हॉस्टेलमधील खोलीतच त्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बाकीचे मुले परत आल्यावर समजला.
त्याच्या इतर मित्रांनी त्याला खाली उतरवून तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले, मात्र रूग्णालयात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद पोलीस दप्तरी झाली नव्हती.
त्याचे आई-वडीलही पुण्याहून बीडकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.
यापुढे मी नव्हे तर फक्त फोटो दिसेल :
गर्लफ्रेंडसोबत नरेनचे कडाक्याचे भांडण झाले.
दोघांमध्ये ‘पॅचअप’ न झाल्याने नरेन खुप संतापला होता.
त्याने तिला यापुढे मी नव्हे तर तुला फक्त माझा फोटो दिसेल, असेही सांगितले होते. त्यानंतर हे प्रकरण मित्रांना समजले. त्यांनी खुप समजावले.
मात्र तणावाखाली असलेल्या नरेने अखेर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
हे प्रकरण नरेनच्या बहिणीलाही माहिती होते, अशी माहिती समोर येत आहे.
परंतु याला दुजोरा मिळाला नाही.पेठबीड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.