भारतीय बॉक्सर निकहत जरीन ने जगात भरता चे नाव कोरत वाजवला भोगा
प्रतिनिधि
अब्दुल समद शेख
भारतीय बॉक्सर निकहत जरीनने गुरुवारी इस्तंबूल येथे महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्लायवेट (५२ किलो) गटाच्या एकतर्फी अंतिम फेरीत थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासचा ५-० असा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. तेलंगणाची बॉक्सर जरीनने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला एकमताने पराभूत केले. या विजयासह जरीन ही विश्वविजेती ठरणारी केवळ पाचवी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे.
ही कामगिरी करणारा तो ५ वा भारतीय बॉक्सर ठरला आहे या विजयासह झरीन ही विश्वविजेती बनणारी पाचवी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. त्याच्या आधी, सहा वेळा चॅम्पियन एमसी मेरी कोम (२०९२, २००५, २००६, २००८, २०१० आणि २०१८), सरिता देवी (२००६), जेनी आरएल (२००६) आणि लेखा केसी यांनी हे पराक्रम केले आहेत.
कोण आहे वर्ल्ड चॅम्पियन
निकहत जरीन त्यांचा जन्म १४ जून १९९६ रोजी निजामाबाद, तेलंगणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मुहम्मद जमील अहमद आणि आईचे नाव परवीन सुलताना आहे. या भारतीय स्टारने वयाच्या १३ व्या वर्षी बॉक्सिंग ग्लोबसशी मैत्री केली. भारतीय बॉक्सिंग लीजेंड एमसी मेरी कोमला तिचा आदर्श मानते. विवाद निकहत जरीन नेहमीच तिच्या हक्कांसाठी लढत असते. तिने आपल्या कारकिर्दीत एकदा फेडरेशन आणि तिची आदर्श मेरी कोम यांच्याशीही संघर्ष केला आहे.
खरं तर, भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने सहा वेळा विश्वविजेती एमसी मेरी कोमला ऑलिम्पिकमध्ये चाचणी न घेता ५१ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधी बनवले. यादरम्यान, बीएफआयचा नियम असा होता की केवळ महिला आणि पुरुष या दोन्ही गटातील पदक विजेत्यांनाच ऑलिम्पिक पात्रता फेरीत पाठवले जाईल. मात्र, हा नियम केवळ सुवर्ण आणि रौप्यपदक विजेत्यांसाठीच होता. त्यामुळे निकतला मेरी कोमविरुद्ध चाचणीतही लढण्याची परवानगी नव्हती.
त्यानंतर समितीचे तत्कालीन अध्यक्ष राजेश भंडारी यांनी निखत फ्युचरसाठी बचत करत असल्याचे सांगितले होते. ही बाब निखतला समजताच त्यांनी याविरोधात आवाज उठवला. त्यानंतर त्यांनी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून खटल्याची मागणी केली होती. ज्यानंतर चाचण्या घेण्यात आल्या. एमसी मेरी कोमने हा सामना जिंकला. मात्र, या सामन्यानंतर मेरी कोमने त्याच्याशी हस्तांदोलनही केले नाही असो मुसलमान द्वेषाची हाळी दिल्याशिवाय ना दिवस उगवतो ना मावळतो.पण शेवटी होत का
य,सगळे मुसळ केरात ! एनआरसी , सीएए, एनपीआर , तलाक , माँबलाँंचीग , बाबरी मज्जीद , हिजाब, तब्लिग, चालीसा,अजान,भोंगा,ताज,लिंग.या गदारोळाला मुस्लिम समाज न संतापता,न आक्रमक होता शांत संयमाने केवळ ‘बघत’ आहे.
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो अहोरात्र दिवस कष्ट करत असतांना ज्या स्थितीतुन देशातील मुस्लिम समुदायाला समोरे जावे लागंत आहे ते कदाचित क्रांतिकारक यांनी दिलेले योगदान व बलीदान यांच्या परिवारातील सदस्य हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे सर्वच नाहीत पण देशातील काही राजकीय पक्ष व राजकीय नेते मात्र देशातील वातावरण व द्वेष पसरवण्याचे कार्य करत आहेत ज्यांनी देशाच्या हितासाठी मुस्लिम क्रांतिकारक यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तो इतिहास आहे.
पण येथे मुसलमानांना व्हिलन बनवणे जोरशोरसे सुरु असताना तिथे विदेशात निखत नसरीन ने महीला जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवुन चॅम्पियन ठरली आहे जगात भारताचे नाव रोशन केले आहे.आपले वादविवाद तर चालु राहतील पण एका मुलीने भारताच्या मुकुटात मानाचा हिरा सजवलाय याची दखल घेण्यात गरज आहे !.हिजाब प्रकरणातील मुलगी आणि आता जागतीक चॅम्पियन मुलगी.!
मुलींना शिकवले,कलाकौशल्य खेळात संधी दिली तर चमकतीलच याचा विश्वास बाळगा.कुटुंबाचा मजबुत आधार बनतील आणि देशाचे नाव ही उज्वल करतील.शंका बाळगण्याचे कारण नाही.
या विजयात निखतचे प्रशिक्षक भास्कर भट यांचा मोठा वाटा आहे.त्यांचंही मनापासून कौतुक आणि अभिनंदन . निखत देश को तुझपर नाज है ! देशकी तमाम बेटीयोंको तुझपर नाज है! अशी चर्चा होत आहे भोंग्यावरुन वादळ निर्माण करणारे मात्र याबाबत काय भुमिका घेतात हा भाग वेगळा ? निकहत जरीन ने जगात भारताचे नाव कोरत भोंगा वाजवला.याची चर्चा व अभिनंदन होत आहे. मीडिया डीटेकशन प्रेस द्वारे त्रिवार अभिनंदन आणि सलाम.