वळदगाव येथे सात वर्षीय बालिकेवर दुकानदाराने केला बलात्कार बलात्कारी फरार !
प्रतिनिधि.
औरंगाबाद घटना आहे. चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय बालिकेवर दुकानदार तरूणानेच अतिप्रसंग करून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वळदगाव येथे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून त्याच्याविरूद्ध सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अजय रमेश बनसोडे (२०,रा.वळदगाव)असे नराधम आरोपीचे नाव आहे.
याविषयी सातारा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेची ७ वर्षीय चिमुकली आज सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेली होती.
यावेळी आरोपी अजय हा दुकानात एकटाच होता.
याप्रसंगी त्याने पीडितेला दुकानात बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडिता रडतच घरी गेली. यावेळी चिमुकलीने रडतच तिच्यासोबत झालेल्या अत्यााचाराची माहिती तिच्या आईला दिली.
या घटनेनंतर पीडितेचे नातेवाईक आरोपीच्या दुकानाकडे गेले असता तो दूकान बंद करून पळून गेल्याचे त्यांना निदर्शनात आले.
या घटनेनंतर त्यांनी लगेच सातारा पोली ठाण्यात धाव घेतली आणि पीडितेच्या मातेने आरोपीविरूद्ध फिर्याद नोंदविली.
पोलिसांनी नराधम अजयविरूद्ध बलात्कार आणि बाललैैगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली.
पोलीस उपनिरीक्षक सुशीला खरात यांच्या पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला.
पोलिसांनी युद्धपातळीवर आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी रात्री उशीरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले !