शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची 24 नोहेंबर 2022ची पत्रकार परिषद काय बोलले ठाकरे साहेब?
शिवसेना जनसंपर्क विभाग
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उध्दवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद २४ नोव्हेंबर २०२२
सध्याची परिस्थिती कुणी यावे आणि टपली मारून जावे अशी. एकीकडे देशाचे कायदामंत्री न्यायधीशांच्या नियुक्तीत अपारदर्शकता असल्याचे जाहीर विधान करुन न्याय व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण करताहेत.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निवडणुक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुनावणी घेते आहे. मी त्यापुढे जाऊन वेगळा पण महत्वाचा विषय मांडतोय. राज्यपालांची नियुक्ती ही साधारणपणे केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असत त्या विचारासरणीच्या व्यक्तींची केल्या जाते. मला वाटतय की याबाबत सुध्दा काही निकष ठरवण्याची वेळ आली आहे. कुणी गैरसमज करु नये पण ज्यांना वृध्दाश्रमात सुध्दा कुणी घेणार नाही अश्यांची राज्यपालपदी नियुक्ती होते आहे.
सडक्या मेंदूच्या मागे नक्की कुठला मेंदू याचा शोध घ्यावा लागेल. मी राज्यपाल पदाचा आदर करतो, परंतु कोश्यारींचा नाही. या अगोदर सावित्रीबाई, महात्मा फुलेंबाबत आपत्तीजनक विधान. त्यानंतर मुंबई, ठाणेकरांच्या बाबतीत तोच प्रकार आणि आता आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अव्हेलना, अपमान कोश्यारीने केला आहे.
मुख्यमंत्री लाचार असल्यामुळे दिल्लीश्वरांच्या कृपेमुळे मुख्यमंत्रीपदी त्यांच्यात राज्यपालांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. मुख्यमंत्री म्हणजे पैचान कोन अशी अवस्था. उपमुख्यमंत्री फक्त सारवासारव करताहेत. याविरोधात माझे महाराष्ट्रप्रेमींना आवाहन एकत्र या आणि एकत्र याविरोधात आवाज उठवू या! केंद्राला जाग येणे गरजेचे महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा नाही हे पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे. शांततेच्या मार्गाने विरोध करुयात.
सावरकरांच्या बाबतीत सविस्तर भूमिका मांडली आहे, परंतु हा विषय आमच्या दैवताशी निगडीत आहे. पवार साहेबांनी, उदयनराजेंनी, संभाजीराजेंनी पण भूमिका मांडली आहेच. भाजपातील महाराष्ट्र प्रेमींना पण माझे या विरोधात एकवटण्याचे आवाहन आहे. Amazon चे पार्सल परत जायला हवे नाहीतर आम्ही दाखवू कसे परत पाठवायचे ते. कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख बोलले “बाप बापच असतो” त्यात जुना नविन अस काहीच नसतं.
कालची मंत्रिमंडळाची बैठक का रद्द केली? अपवादात्मक परिस्थितीतच मंत्रिमंडळाची बैठक रद्द करतात. माझ्या वाचनात आलय की मंत्रिमंडळ गुजराथला प्रचारात व्यस्त. गुजराथ राज्यात निवडणुकांसाठी महाराष्ट्र सुट्टी ही नविन पध्दत. उद्या पाकिस्तानात निवडणुका असल्यावर पण कदाचित सुट्टी जाहीर करतील.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्रातील गावांवर अधिकार सांगू लागले आहेत. ही दिल्लीश्वरांची भूमिका आहे काय?
साभार:यासीन कुरेशी