अंधश्रद्धेतील विकृतीचा नवीन प्रकार, प्रयोगात मूली ला नग्न करून अघोरी मान्त्रिक पूजा?

वर्धा :
पैशाचा पाऊस पाडण्याच्या प्रयोगात मुलीचा जीव धोक्यात घालणाऱ्या आईसह सात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अंधश्रद्धेतील विकृतीचा नवाच प्रकार पुढे आला आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक पंकज वंजारे यांनी या प्रकरणात पोलिसांना सहकार्य केल्यानंतर आश्चर्यकारक घटना पुढे आली.
विज्ञान शाखेत पदवीला शिकणाऱ्या व स्थानिक कारला चौकात राहणाऱ्या एका वीस वर्षीय मुलीवर ही आपत्ती ओढवली.
ती हरवल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी स्थानिक रामनगर पोलिसांकडे केली होती.
तपास सुरू झाल्यानंतर यात मांत्रिकाची बाब पुढे आली.
मुलीच्या आईच्या संपर्कात आलेल्या एका युवतीने पैशाचा पाऊस पडण्याचा प्रयोग सांगितला.
मुलीवर चंद्रपूरचा मांत्रिक मंत्रशक्तीने प्रयोग करेल.
त्यामुळे पैशाचा पाऊस पडेल.
गुप्तधनाचा शोध लागेल.
लग्नासाठी पैसा लागेल,
कर्ज फेडल्या जाईल,
असे सांगत मुलीच्या आईने मुलीला प्रयोगासाठी तयार केले.
हिंगणघाट तालुक्यातील नांदगावच्या प्रवीण मागरूटकर हा मध्यस्थी होता.
निर्वस्त्र अवस्थेत अघोरी पूजा करावी लागणार असल्याचे प्रवीणने पटवून दिले!
मुलीने विरोध केल्यावर आईसह काका व काकूने जबरदस्तीने प्रवीणच्या शेतात नेले.
तेथे मुलीवर अघोरी प्रयोग झाले.
मुलीने सुटण्याचा प्रयत्न केल्यावर आईनेच मुलीला जबरीने पकडून ठेवले.
दुसऱ्या दिवशी काकाच्या घरी परत याच प्रयोगाची पुनरावृत्ती झाली.
प्रवीण म्हणेल तसे न केल्यास मारून टाकण्याची धमकी आईने दिल्याची बाब पीडित मुलीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद आहे?