अक्कलकोट रोडवरील हिंदू स्मशानभूमी बनतेय दारूचा अड्डा , दारुड्या साठी आहे का स्मशान भूमी?

IMG-20210404-WA0098

सोलापूर :
सोलापूर अक्कलकोट रोडवरील हिंदू स्मशानभूमी येथील स्मशानभूमी सध्या दारुड्यांनी दारूअड्डा बनवली असून दिवसाढवळ्या येथे दारुड्यांच्या मैफिली रंगताना दिसत आहे.
अतुल्य सेवा प्रतिष्ठान श्रीनिवास यन्नम यांनी स्वतः खर्च करून एखादया बागेसारखी शुशोभीकरण बनवलेली ही स्मशानभूमी आहे.

सोलापूर अक्कलकोट रोडवरील हिंदू स्मशानभूमीत फेरफटका मारला असता आजूबाजूला देशी,विदेशी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे.
तर दारू पिणारे बागेत गोल रिंगण करून दारू पित बसताना दिसतात.
स्मशानभूमी ही अंत्यविधी आणि दशक्रिया विधीसाठी सुशोभित केली असताना सध्या माञ दारू पिणाऱ्यांचे हक्काचे स्थान होत आहे.

सोलापूर अक्कलकोट रोडवरील हाकेच्या अंतरावर ही स्मशानभूमीआहे.
स्मशानभुमीत मोठी झाडे असून बसण्यासाठी बाकांची उत्तम सोय केली आहे.
या सर्व सोयी सुविधाचा शहरातील तळीरामांनी अगदी पुरेपूर फायदा घेतलेला दिसून येत आहे.
शहरातील नागरिकांची ना जेलरोड पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे कसलीही भीती या दारुड्यांना नाही.
दिवसभर केव्हाही आणि कितीही वेळ येथे दारू पिऊ एन्जॉय केले जात असून वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना याची खबर नाही.
गेले अनेक दिवस हा प्रकार चालू असून.
तत्काळ यावर कारवाई होणे गरजेचे असून तळीरामांची तळी भरण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT