आता न्यायालयीन कामकाज फक्त अडीच तास !५०.टक्के कर्मचारी राहणार हजर ?

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापकीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार न्यायालयाचे कामकाज अडीच तास चालणार आहे.
दरम्यान, फक्त ५० टक्के कर्मचारी न्यायालयात हजर राहणार असून कोठडी, जामीन आणि तत्काळ कामे होणार आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सध्या राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत न्यायालयाचे कामकाज पूर्णवेळ सुरू होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा न्यायालयीन कामकाजामध्ये बदल करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व जिल्हा आणि मॅजिस्ट्रेट न्यायालय केवळ एकाच सत्रामध्ये काम करणार आहे.
जिल्हा न्यायालयात कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते १२.३० अशी वेळ देण्यात आली आहे.
सकाळी १० ते १२.३० दरम्यान न्यायालयाचे कामकाज सुरू राहणार आहे.
दर शनिवारी व रविवारी न्यायालयाला सुटी राहणार आहे.
अडीच ते तीन तासांच्या न्यायालयीन वेळेमध्ये फक्त ५० टक्के कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत.
एकूण न्यायाधीशांपैकी निम्मे न्यायाधीश एक दिवस तर निम्मे न्यायाधीश दुसऱ्या दिवशी न्यायालयीन कामकाज पाहणार आहेत.
कर्मचाऱ्यांनाही एक दिवसाआड काम करावे लागणार आहे.
न्यायालयीन वेळेमध्ये फक्त आरोपींना पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी, जामीन व तत्काळ कामे होणार आहेत.
जिल्हा सरकारी वकील अड.प्रदिपसिंग राजपूत यांनी सांगितले.