कड़क निर्बंध हा तर सरकार मार्फत अन्याय नाही का?सामान्य व गरीबानी कसे जगावे?

प्रतिनिधी:-
निर्बंधांविरोधात व्यापारी रस्त्यावर,
करोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाविरोधात राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरले.
सरकारने आदेशात सुधारणा करावी,
अन्यथा शुक्रवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ या संघटनेने दिला.
सकाळी पोलिसांनी जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने बंद करण्याचे आवाहन करताच व्यापाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली.
भा.ज.पा.ची स्थानिक मंडळी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभी राहिली आणि दुकाने सुरू ठेवावीत,
अशी मागणी केली.
करोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाने जारी केलेल्या नव्या निर्बंधांबाबत गैरसमज पसरल्याने गोंधळ उडाला.
राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
मात्र, पोलिसांनी समजूत काढत, कारवाईचा धाक दाखवत,
सौम्य बाळाचा वापर करत निर्बंधांची अंमलबजावणी केली.
मुंबईतील महत्वाच्या आणि मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी आदेशाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
दादरमध्ये व्यापाऱ्यांनी सोमवारी रात्रीपासूनच निषेधाला सुरवात केली.
दुकानाबाहेर निषेध फलक लावले.
दादर स्थानक ते शिवाजी पार्क परिसरातील दुकाने मात्र सकाळी उघडण्यात आली होती.
दुकानांमध्ये ग्राहकांचा वावरही होता.
परंतु, दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केल्याने व्यापाऱ्यांनी त्यांना विरोध केला.
प्रत्येकजण आपली व्यथा मांडत होता.
व्यापारी आणि कामगारांच्या गर्दीमुळे दादर स्थानकाबाहेरचा परिसर गजबजला होता.
शेवटी पोलिसांनी व्यापाऱ्यांची समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणली.
अंधेरी-बोरीवलीमध्येही अशाच पद्धतीने निषेध करण्यात आला.
बोरीवली पूर्वेकडील व्यापाऱ्यांनीही घोषणाबाजी केली.
दूसरी कड़े मुंवईचे समस्त होकर्स सुधा बे हाल झाले आहेत.
एक महीना भर पूर्ण झाला .लेमिंगटन रोड ग्रांट रोड , डीबी मार्ग येथिल फेरीवालयाना डी वार्ड मनपा धंधा करू देत नाही? म्हणून फेरीवाल्या चे समस्त कुटुंबा ची उपस्मार चालली आहे .रोज कमवा आणि रोज खा .अशी स्थिति अस्ता लॉक डाउन मधे गरिबानी रोजी रोटी ,कुठून व कशी काय कमवाय ची?
या बाबत राज्य सरकार ने विचार करावा जरूर लक्ष ध्यावे.