काय आता करोना प्रत्येक घरी, दारोदरी पोहोचला आहे?

प्रतिनिधी:-
कोरोना हे जसे “संसर्गजन्य युद्ध” आहे तसेच त्याचा “सांस्कृतिक युद्ध” म्हणून वापर करण्याचा मानवतेच्या आणि लोकशाहीच्या शत्रूंचा मुख्य उद्देश दिसतोय.
हे आपल्या अजूनही लक्षात आले नसेल तर अवघड आहे.
कोरोना प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलाय.
येत्या काळात प्रत्येकाला होय प्रत्येकाला या कोरोना नामक विषाणूचा सामना करायचा आहे. त्
यासाठी प्रत्येकाने आपली मानसिक तयारी करणे आवश्यक आहे.
तसेच स्वतःला शारीरिकदृष्ट्या मजबूत ठेवायचे आहे.
स्वतःची काळजी घेणे, उत्तम आहार घेणे, व्यायाम करणे, सकारात्मक विचार करणे, आपल्या जवळच्या माणसांशी संवाद ठेवणे,स्वतःला ताण-तणावमुक्त ठेवणे, सुसंवादावर भर देणे, स्वच्छतेला प्राधान्य देणे, प्राणायम करणे,
आयुर्वेदिक काढे घेणे असे अनेक प्रयोग स्वतःवर करणे आवश्यक आहे.
येथून पुढील आयुष्य जो अशाप्रकारे ठेवेल किंवा अती स्वच्छता, सकस आहार, सकारात्मक मनस्थिती आणि आवश्यक व्यायाम ही निरोगी आणि प्रसन्न आयुष्याची चतु:सूत्री असणार आहे.
तेव्हा स्वतःच स्वतःला पॅनिक करून घेऊ नका. निर्भयपणे परिस्थितीचा सामना करा.