तर अमित शाहांवर गुन्हा का दाखल केला नाही?

प्रतिनिधी:-
करोनाच्या काळात नियमांचं पालन न करता आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यावरुन मे. कर्नाटक हायकोर्टाने बेळगावच्या पोलीस आयुक्तांना फटकारले आहे.
या मेळाव्यामध्ये भा.ज.पा. नेत्यांसह अमित शाहांसारख्या व्यक्ती होत्या त्यांच्याविरोधात गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल मे.कोर्टाने पोलीस आयुक्तांना केला आहे.
या मेळाव्यामध्ये करोनाच्या नियमांचे पालन करण्यात आलं नसल्याचे मे.कोर्टाने म्हटलं आहे.
१७ जानेवारी रोजी कर्नाटकच्या बेळगाव येथे अमित शाहा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.
मुख्य न्यायाधिश अभय श्रीनिवास ओका आणि सूरज गोविंदराज यांच्या खंडपीठापुढे यासंदर्भात सुनावणी झाली.
यावेळी न्यायाधिशांनी पोलीस आयुक्तांना यासंदर्भात विचारणा केली होती.
पोलीस आयुक्तांकडून देण्यात आलेले हे उत्तर निष्काळजीपणा असल्याचे म्हणत मे.न्यायालयाने टीका केली आहे.
पोलीस आयुक्तांना कर्नाटकमध्ये लागू करण्यात आलेल्या साथ रोग कायदा २०२० बद्दल माहिती नाही असे वाटते.
कदाचित १५ एप्रिल रोजी राज्य सरकारने लागू केलेल्या नविन कायद्यांविषयीसुद्धा पोलीस आयुक्तांना माहिती नाही,
असे मे.न्यायालयाने म्हटले.
१७ जानेवारी रोजी लोक विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळता मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.
आयुक्तांनी दिलेल्या उत्तरात एकही गुन्हा दाखल न झाल्याचे समजले.
सर्व प्रतिज्ञापत्र वाचल्यानंतर हे प्रकरण गंभीररित्या घेतले नसल्याचे दिसत आहे.
आयुक्त फक्त २० हजारांचा दंड घेऊन आनंदी आहेत असं वाटतं.