दर वर्षी आज च्या दिवशी नागरी सेवा दिन सिव्हिल सर्व्हिस डे नावाने साजरा केला जातो आणखी काय विशेष ? ते पहा !

रिपोर्टर:-
दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस ‘नागरी सेवा दिन’ अर्थात सिव्हिल सर्व्हिस डे ‘म्हणून साजरा केला जातो’.
या प्रसंगी कार्मिक, तक्रार निवारण व निवृत्ती वेतन, मंत्रालयातील प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाद्वारे विविध कार्यक्रम आयोजिन केले जाते.
२१ एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेक्टाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते.
या दिनाच्या स्मृतिनिमित्त 2006 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमापासून नागरी सेवा दिवस नियमितपणे साजरा केला जातो.
या दिवशी नागरी सेवक स्वतःला पुन्हा नागरिकांच्या सेवेत समर्पित करतात आणि जनसेवेच्या कार्याप्रती आपल्या प्रतिबंधतेचा पुनरूच्चार करतात.
या दिनाच्या निमित्ताने, ‘लोक प्रशासनमध्ये प्रधानमंत्री उत्कृष्ट पुरस्कार’ तीन श्रेणींमध्ये प्रदान केला जातो.
2006 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली.
केंद्र व राज्य सरकार मधिल नागरी सेवकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करणे हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य आहे.