देशमुखांवरील आरोपांची चौकशी करण्यास परमबीर यांना कोणी रोखले होते ?’ मां.उच्च न्यायालय चा सवाल !

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बारमालकांकडून १०० कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून कळले तेव्हा मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी (परमबीर सिंह) या प्रकरणाची चौकशी का केली नाही ?
त्यांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल का केला नाही ?
तसे करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते ?
असा प्रश्नांची सरबत्ती करत मां.उच्च न्यायालयाने परमबीर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
मांननीय न्यायालयाने यावेळी या प्रकरणाच्या करण्यात आलेल्या तपासाचा प्रगती अहवाल मोहोरबंद पाकिटात सादर करण्याचे आदेशही सी.बी.आय.ला दिले.
देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करताना आरोपांशी संबंधित सगळ्यांचीच चौकशी करण्यात येईल, असा दावा सी.बी.आय.तर्फे केला गेला.
त्यावेळी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने उपरोक्त प्रश्न उपस्थित केले व परमबीर यांच्या या प्रकरणातील भूमिके वर बोट ठेवले.
बदली होईपर्यंत सगळे नीट सुरू होते.
ती झाल्यानंतर मात्र देशमुखांवर आरोप केले गेले याकडेही मां. न्यायालयाने लक्ष वेधले.
तसेच देशमुखांवरील आरोपांची व्याप्ती एका माणसापुरता मर्यादित नसून त्याच्याशी संबधित सगळ्यांची चौकशी करण्याचा पुनरूच्चारही केला.
न्यायालयाच्या चौकशीचा मतितार्थही हाच होता,
असेही मे.न्यायालयाने स्पष्ट केले.
देशमुख यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी
केलेल्या याचिके वरील निर्णयही मा.न्यायालयाने या वेळी राखून ठेवला आहे.