फक्त यूपीए सरकार आणि महाविकास आघाड़ी सरकार च भ्रष्ट आहे का?

रिपोर्टर:-
यूपीए सरकार भ्रष्ट आहे, असे समीकरण लोकांसमोर ठसवण्यात भाजपला यश आले होते.
त्यावेळी अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनास भाजपने प्रोत्साहन दिले.
परंतु सत्तेवर आल्यानंतर सक्षम लोकपाल यंत्रणा निर्माण करण्याबाबत मात्र अण्णांच्या तोंडाला पाने पुसली!
आज महाराष्ट्रात ठाकरे सरकार हे महावसुली सरकार आहे,
असे समीकरण लोकांच्या मनावर बिंबवण्यात येत आहे. प्रत्यक्षात वसुलीचा आरोप सिद्ध झालेला नाही.
उलट 1995-99 मध्ये सेना-भाजप राजवटीत महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे घडली आणि काही मंत्र्यांना आरोपानंतर घरी जावे लागले. त्यामध्ये शोभाताई फडणवीस, महादेव शिवणकर या भाजपच्या मंत्र्यांचाही समावेश होता.
तेव्हा त्या सरकारला कोणीही महावसुली सरकार म्हटले नव्हते.
फडणवीस सरकारमध्ये शिवसेना होती, तेव्हा मात्र ती पवित्र होती!
तसेच फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप झाले.
प्रकाश मेहता, एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला,
तेव्हा ते सरकार महावसुली सरकार नव्हते!
का त्यातला प्रत्येकजण कुंभमेळ्यात जाऊन, गंगास्नान करून, मगच शपथ येत होता?
आज फडणवीस यांच्या आजूबाजूला जे इम्पोर्टेड व भांडवलदार नेते आहेत,
ते रोज निरमा पावडरने आपले कपडे धुवत असतात का?
कोकणातल्या ज्या नेत्यास बाळासाहेब वसूलमंत्री म्हणत,
ते खरे ‘ओरिजनल महावसुली सरकार’ आहे, असे फडणवीसांना कधी वाटले नाही का?
की ते दुसऱ्या पक्षात होते, तेव्हा महावसुली करत होते आणि स्वपक्षात आल्यानंतर महापरतफेड करत आहेत, असे भाजपच्या महाराष्ट्रातील महानेत्याला वाटत आहे ?
जयंतराव पाटील यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर जमिनीसंबंधी आरोप केले होते,
त्यावेळी कोणीही चंद्रकांतदादांना महावसुलीभाई म्हटले नाही! सध्या पक्षात जे काही चालू आहे,
ते भाजपमधीलच अनेक निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांना पटत नाही. पक्षात सर्व काही मंगल आहे,
असे त्यांना वाटत नाही. कोणी बोलण्यात प्रवीण आहे,
तर कोणी बरळकर आहे. कोणी प्रसाद वाटत काही जणांचे लाडही करत आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात दुसरी कंपनी एखाद्या कंपनीचा घास घेते. ती टेकओव्हर करते,
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भाजप भलत्याच लोकांनी टेकओव्हर केला आहे का?
असा सवाल काही कार्यकर्ते करत असल्याचे बोलले जाते.
खरेखोटे रात्रीस खेळ चालेवाल्यांनाच माहिती!