बंजारा समाज चे नेते संजय भाऊ राठौड़ समस्त महाराष्ट्र दौर्यावर! काय आहे मुख्य हेतु ?

सध्या:-प्रतिनिधी.
बंजारा समाजाच नेते महाराष्ट्राचे माजी वनमंत्री मा ना संजयभाऊ राठोड यांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्याला काल दि.5/4/2021 पासून पालघर जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली असून,
माननीय संजयभाऊ राठोड आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या प्रत्येक तांडा वाड्यावर जाऊन तेथील समाजाच्या नायक कारभारी तसेच समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी सोबत बैठक घेऊन समाजाचे विविध प्रश्न समजून घेत,
ते शासन दरबारी मांडून ते प्रश्न सोडविण्याकरिता या महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली आहे.
याची सुरुवात आज पालघर जिल्ह्यातून करण्यात आली यावेळी पालघर तसेच वसई-विरार यासह विविध ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण गोर बंजारा समाजाच्या तांडा वाडी वस्ती वर जात ,
तेथे भेट देऊन माननीय संजय भाऊ राठोड यांनी त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या यावेळी शिवसेना बंजारा समाज ठाणे/पालघर जिल्हा संघटक सुधीर भाऊ राठोड,
बंजारा फ्लिम दिग्दर्शक सी के पवार ,राष्ट्रीय बंजारा टायगर्स प्रदेश समनव्यक रवी भगवान राठोड,
राष्ट्रीय बंजारा टायगर्स पालघर जिल्हाध्यक्ष अतुल राठोड, शिवसेना बंजारा समाज पालघर जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, कवी आनंद भाऊ चव्हाण वसई,पालघर जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या विविध संघटनांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.