रोज घड़त अस ले ले समृद्धि मार्ग चे अपघात कसे कमी होतिल ?
मुँबई प्रतिनिधि
समृद्धी महामार्गावरचे अपघात होणार कमी; कसे ? वाचा खुलासेवार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एकूण 15 इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (ता.27) महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली.
ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. या वेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.
समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटरचा असून इगतपुरीपर्यंत तो वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या मार्गावर अपघात रोखण्यासाठी अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी 15 महामार्ग पोलिस केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहनांची मागणी महामंडळाकडे केली होती.
त्यानुसार 15 वाहने खरेदी करण्यात आली असून या वाहनांना ब्लिंकिंग लाईट बार, प्राथमिक उपचार सामग्री, अग्निशमन यंत्रणा महामंडळाकडून जोडण्यात आली आहे. \
या महामार्गावर बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत उभारली आहे. वन्यप्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने 21 रुग्णवाहिका 21, ई.पी.सी. गस्त वाहने 14, महामार्ग सुरक्षा पोलिस केंद्रे 13, 30टन क्षमतेची क्रेन 13, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत 142 सुरक्षारक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.
साभार,: मोहमद दादासाहेब पटेल