व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भा.ज.पा.चे पाठबळ?

प्रतिनिधी:-
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या राज्यभरातील आंदोलनाला भा.ज.पा.ने उघडपणे पाठिंबा दिला आहे.
भा.ज.पा.ने फूस दिल्यामुळेच व्यापारी वर्गाने कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नये,
असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुंबईत व्यापाऱ्यांना आपले व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी यासाठी मुंबई भा.ज.पा.ने पुढाकार घेतला आहे.
व्यापारी आणि दुकानदारांना उदरनिर्वाह करण्याचा मूलभूत अधिकार आहे.
करोनासारख्या महासाथीला वेळीच आळा घालणेही आवश्यक आहे.
परंतु व्यापारी आणि दुकानदारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुकाने सुरू ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे.
व्यापारी आणि दुकानदारांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी दुकाने उघडी ठेवण्याची मागणी मुंबई भा.ज.पा.चे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली.
ठाण्यात भा.ज.पा. आमदारही रस्त्यावर ठाण्यात दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी म्हणून व्यापाऱ्यांबरोबर भा.ज.पा.चे नेते रस्त्यावर उतरले होते.
आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी,
अशी मागणी केली.
कठोर निर्बंध असू दे,
पण सर्व काळ टाळेबंदी नको.
व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देणे गरजेचे आहे,
असे मत भा.ज.पा.चे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.