समस्त महाराष्ट्र ,दहावी चा कसा काय आणि किती छान आहे निकाल? पहा !

पुणे –अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा इयत्ता दहावीचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 99.96 टक्के इतका लागला आहे.
पुणे विभागात फक्त 97 विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत.
सोलापूर आणि नगर जिल्ह्याचा निकाल 99.97 टक्के, तर पुणे जिल्ह्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. यंदा निकाल अडीच टक्क्यांनी वाढला आहे.
राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला.
पुणे विभागातून 2 लाख 65 हजार 801 विद्यार्थी दहावी परीक्षा दिली.
त्यापैकी 2 लाख 65 हजार 704 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहेत.
त्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 99.97, तर मुलांचे 99.95 इतके आहे.
पुनपरीक्षार्थी अर्थात रीपीटर विद्यार्थ्यांचा पुणे विभागाचा निकाल 91.86 टक्के लागला.
गतवर्षी पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के होता.
यंदा मात्र निकाल 2.62 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट
होत आहे.
पुणे : 99.95 टक्के
पुण्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 99.95 टक्के इतका लागला आहे.
जिल्ह्यात दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 30 हजार 23 इतकी आहे.
त्यापैकी 1 लाख 29 हजार 962 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
म्हणजेच पुण्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या फक्त 61 एवढी आहे.
मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 99.93, तर मुलींचे 99.97 आहे.
अहमदनगर : 99.97 टक्के
नगर जिल्ह्याचा निकाल 99.97 टक्के लागला आहे.
नगर जिल्ह्यातून दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 70 हजार 585 आहे. त्यात उत्तीर्णाची संख्या 70 हजार 566 इतकी आहे.
सोलापूर : 99.97 टक्के
सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.97 इतका लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यातून दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 65 हजार 193 इतकी आहे.
त्यातून 65 हजार 176 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहेत.