भारतीय स्वातंत्र्याला जितकी वर्षे होत आहेत, तितकीच वर्षे आज मुमताजला होत आहेत.

रिपोर्टर:-
नाईका मुमताज , ची करोडो चाहत्यांची मने पारतंत्र्यात गेली..
टपोरे डोळे. अपरं नाक आणि रसरशीत सौंदर्य यामुळे मुमताज लक्षात राहिली.
तिच्या अभिनयात ग्रेट असं काहीच नव्हतं. परंतु तरीही त्यात नैसर्गिक सहजता होती.
ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या नायिकेच्या भूमिका तिने समर्थपणे निभावल्या आईना. प्रेमकहानी,
आप की कसम, दुश्मन, रोटी, दो रास्ते असे तिचे अनेक चित्रपट गाजले.
पण तिचे वैशिष्ट्य म्हणजे दारासिंगपासून ते दिलीपकुमारपर्यंत असा प्रवास तिने एक अभिनेत्री म्हणून केला.
“बंधे हाथ” हा चित्रपट अमिताभ सोडून कोणालाच माहिती नाही.
परंतु त्यात त्याचा डबल रोल असून मुमताज ही त्याची नायिका आहे. मुमताजचे आई-वडील इराणी होते.
तिचा जन्म झाल्यावर वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.
मुमताजची आई माहेरी गेली . आर्थिक परिस्थिती बिकट होती.
त्यामुळे खूप कमी वयातच मुमताजला आणि तिच्या बहिणीला मल्लिकाला चित्रपटात कामे करावी लागली. 1952 साली तिने “संसार” या चित्रपटात बालतारका म्हणून काम केले.
मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी या नट्यांनी करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणूनच केली.
गंमत म्हणजे दारासिंगची नायिका म्हणूनच मुमताजला लोक ओळखू लागले आणि मग तिला मुख्य धारेतील बडे निर्माते विचारू लागले. “दो रास्ते” मधून बी ग्रेडपटांची नायिका ए ग्रेडची झाली.
‘हरे राम हरे कृष्णा’ मध्ये देवच्या बहिणीचा रोल तिने नाकारला. त्यात ती देवची प्रेयसी होती. “तेरे मेरे सपने” मध्ये ती प्रभावी वाटली.
विशेष म्हणजे देव व धर्मेंद्रच्या देखणेपणावर ती लुब्ध होती.
अभिनयाची तिला कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. मात्र शम्मी कपूर आणि जितेंद्र तिच्या प्रेमात पडले होते.
अपराध, लोफर अशा चित्रपटांत चंट नायिका म्हणूनच ती अधिक शोभली.
कुठलीही पार्श्वभूमी नसताना प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत मुमताज चित्रपट क्षेत्रात प्रस्थापित झाली.
आपल्याकडच्या अनेक मुस्लिम नट्यांनी सिनेमात हिंदू स्त्रीचे रोल्स फार चांगल्या पद्धतीने केले आहेत.
मात्र खूप वर्षे झगडल्यानंतर मुमताजला नायिका म्हणून यश मिळाले आणि लवकर लग्न करून ती परदेशी गेली.
जर किंचित अगोदर तिला तशी संधी मिळाली असती तर तिने त्याचे सोने केले असते.
1960च्या दशकातच ती शिखरावर पोहोचली असती.
ते दिवस तिला 1970 च्या दशकात पाहायला मिळाले.
परंतु आजही मुमताजची आठवण झाली की ‘राम और श्याम’मधील दिलीपकुमारबरोबरचे किंवा ‘रोटी” मधील राजेश खन्नाबरोबरचे तिचे गाणे स्मरते आणि त्या काळच्या आठवणी जाग्या होतात !