‘गॅलेक्सी नोट ७’च्या बॅटर्‍यांचा स्फोट

विक्री थांबविली; सॅमसंगला फटका
सेऊल, दि. २ (वृत्तसंस्था) – जगातील आघाडीची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगच्या बहुचर्चित ‘नोट ७’ या नव्याकोर्‍या मॉडेलमधील बॅटर्‍यांचा स्फोट होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ‘सॅमसंगने नोट ७’ची विक्री थांबविली असून, २५ लाख मोबाईल परत मागविले आहेत. यामुळे सॅमसंगला तब्बल ७ अब्ज रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेसह काही देशांमध्ये दोन आठवड्यांपूर्वीच ‘सॅमसंग नोट ७’चे लाँचिंग झाले. हिंदुस्थानात शुक्रवारी याचे लाँचिंग होणार होते. मात्र, आता पुढे ढकलले आहे. पुढील आठवड्यात ‘अ‍ॅपल’चा नवा फोन बाजारात येत आहे. त्याला टक्कर देण्यासाठी हा फोन बाजारात आला. मात्र, ‘नोट ७’च्या बॅटरीचा स्फोट होत असल्याच्या जगभरातून ३५ तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत सॅमसंगने ‘नोट ७’ ची विक्री थांबविली. आता बॅटरीची तांत्रिक चाचणी केली जाईल.
SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT