उप मुख्यमंत्री अस्ताना देखील बघ्याची भूमिका घेतली अजीत पवार साहेब नी! नी

मुंबई
प्रतिनिधि

निसार शेख

अजित पवार आणी सुनिल तटकरे मतदान म्हणजे भाजपला व RSS मतदान

मुस्लिमांनो आपल्या लोकांना जाळून, कापून, झुंड घेऊन मारणार्‍या मोदी शाह च्या नवीन मित्राला तुम्ही मतदान करणार का?

साताऱ्यात मुस्लिमांना मारले, त्यांची घरे दुकाने जाळली अजित पवारांनी काही कारवाई केली नाही, पुण्यातील मोहम्मद वाडीचे नाव बदलून महादेव वाडी करण्याच्या प्रस्तावावर पालक मंत्री म्हणुन सही केली,
वारजे येथील शिवकालीन मस्जिद संघाने पाडली

पालकमंत्री असताना सुद्धा गप्प राहिले अजित पवार,
मीरा भायंदर मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिमांवर हल्ले केले तरीही अटक मुस्लिम युवकांना करण्यात आले उपमुख्यमंत्री असताना देखील बघ्याची भूमिका घेतली अजित पवारांनी
अशा मुस्लिम विरोधी घडामोडी घडत असताना मूग गिळून गप्प बसलेल्या अजित पवारांना मतं देऊन भाजपची ताकत तुम्ही वाढवणार का?

फडणवीसी अजेंडा.

परवा एबीपी माझा वर फडणवीसांची मुलाकात झाली. त्यांनी स्पष्ट सांगितले की विरोधी पार्टीचे नेते आम्ही आमच्या पक्षात घेतो ते आमच्या अजेंड्यावर घेतो. आमचा आरएसएस चा विचार मान्य असेल तर ठीक नाहीतर आम्ही दोन मिनिटेही अशांना ठेवणार नाही. याचा अर्थ असा कि बीजेपीत गेलेले नेते हे आरएसएसचा विचार स्विकारूनच बीजेपीमध्ये गेलेले आहेत. असे असताना आपले कांही लोक अशा अविचारी दलबदलू नेत्यांच्या मागे कशासाठी जातात. जे नेते भ्रष्टाचारात अडकले आहेत व स्वतःला सावरू शकत नाहीत. स्वतःची सुरक्षा करू शकत नाहीत. जेलमध्ये जाण्याच्या भीतीने नाती तोडून स्वतः चे पक्ष , विचार सोडून संघाचे गुलाम म्हणून काम करायला तयार झाले असे नेते सामान्यांना कोणता आधार देणार? कोणती सुरक्षा देणार? जे दुसऱ्यांचेच आश्रित झालेत ते सर्वसामान्यांना काय आश्रय देणार? काय भलं करणार? एवढा साधा विचार सुद्धा आपल्या लोकांना समजत नाही का?

आमचे एक मित्र बीजेपी अल्पसंख्याक सेलचे काम करतात. मी त्यांना नेहमी विनोदाने म्हणतो की आपण उर्वरित लोकांच्या कबरी लवकर खोदण्यासाठी तिथे पुढे गेलेला आहात. नाहीतर आपल्या हिताचे कोणतेच कारण दिसत नाही.
काय म्हणावे व काय करावे अशा लोकांना?
स्वाधिनची बुद्धी करून ठेवा. विचारांचे कांही करावे स्वहीत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT