आईवरून शिव्या दिल्या चा राग सहन न करता प्रियकराकडून प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या !

unnamed (21)

प्रतिनिधि.

कल्याण येथील वाडेघर परिसरात एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या हत्येचा उलगडा करण्यात क्राईम ब्रँचच्या पथकाला यश आले आहे.
आईवरून शिवी दिल्याचा राग मनात धरुन या महिलेची हत्या प्रियकरानेच केल्याचे उघड झाले आहे!

लताबाई महादेव गवई (वय-३५वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
ज्ञानेश्वर काळूराम पाटील (वय-३२वर्षे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात राहणारा आहे.

कल्याण पश्चिमेकडील वाडेघर परिसरात नीलकंठ कॉम्प्लेक्स परिसरात ६ ऑक्टोबर रोजी एका ३५ ते ४० वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
हा प्रकार उघडकीस आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला.

मात्र, या महिलेची ओळख पटू नये म्हणून दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले होते.
घटनास्थळी रक्ताने माखलेला मोठा दगड पडला होता.
पोलिसांनी हा दगडही जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले होते.

खडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचने समांतर तपास सुरू केला होता.
मूळची बुलढाण्याची असलेली लताबाई सापर्डे गावात राहत होती.
तिचा पती खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे.
त्यामुळे सद्या ती एकटीच राहत होती. याच दरम्यान तिचे त्याच गावात राहणारा ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबध निर्माण झाले.

या अनैतिक संबधांची कुणकुण लागल्याने तिला पतीने सोडून दिले.
यामुळे ती दुसरीकडे राहत होती. मात्र ६ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमाराला सापर्डे गावातील पाटील चायनीज दुकानात एकमेकांची भेट झाली.

त्यावेळी दोघांनीही भरपूर दारू ढोसली होती.
दारूच्या नशेत असल्याने दोघामध्ये काही कारणावरून वाद-विवाद होवून लताबाईने प्रियकर ज्ञानेश्वरला आईवरून शिवी हासडली.

याचाच राग मनात धरून त्याने घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला आपल्या दुचाकीवर बसून वाडेघर परिसरात एका निर्जळस्थळी नेले.
प्रथम लताबाईचा गळा आवळला. मात्र तरीही जिंवत असल्याचे पाहून ज्ञानेश्वरने शेजारी पडलेल्या भल्या मोठ्या दगडाच्या साह्याने डोके ठेचून लताबाईचा खून केला.
स्थानिक खडकपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापर्डे परिसरात गेल्या चार दिवसांपासून जाळे पसरले होते.

या जाळ्यात ज्ञानेश्वर अलगद अडकला.
प्राथमिक चौकशीत कोणतीही माहिती न देणाऱ्या ज्ञानेश्वरने खाक्या मिळताच लताबाईच्या खुनाची कबूली दिली.
३ मुले असलेल्या लताबाईला नवऱ्याने बुलढाण्याहून हाकलून दिल्यानंतर ती कल्याणच्या सापर्डे गावात गेल्या १० वर्षांपासून रहात होती.

तिचे त्याच गावात राहणारा ज्ञानेश्वर पाटील याच्याशी प्रेम जुळले होते.
आईवरून शिव्या हासडल्यामुळे संतापाच्या भरात आपण तिचा मुडदा पडल्याची कबूली ज्ञानेश्वरने दिली !
आरोपी ज्ञानेश्वर याला खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT