सवाल मा. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा नाही प्रश्न आहे प्रशासनावर पाहिजे तसा वचक होता का याचा ?

प्रतिनिधी:-
मा. अनिल देशमुख यांचं चुकलं कुठं ते पाहू !
मा. शरद पवार यांच्या चानाक्ष राजनिती मुळे म्हणा कि “EVM” वर गप्प बसण्यामुळे म्हणा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झाला आहे!
राज्याचा राज्य कारभार हाकत असताना पक्ष, मंत्री, पक्ष प्रमुख हे जेवढे महत्त्वाचे असतात त्या पेक्षा बाबू अधिक महत्त्वाचे असतात !
बाबू” म्हणजे IAS, IPS अधीकारी !
RSS च्या कॕडर कँप मध्ये तयार झालेले बाबू साथीला घेऊन राज्य कारभार चालवणारं असाल,
तर मंत्र्यांच्या राजीनाम्यांची लाईन लागली तर नवल वाटायला नको !
मा. अनिल देशमुख यांनी १०० कोटी मागीतले का नाही, ते दोषी आहे की नाही, तपास CBI करणार की ED हे प्रश्नचं गौण आहेत !
सरकार चालवताना कोणते अधिकारी साथीला असावेत याची निवड करता न येणं ही खरी चुक आहे !
मंत्री म्हणून एकूण प्रशासनावर असावी लागती ती मांडणी महत्त्वाची आहे ! वचक आणि दरारा महत्त्वाचा आहे !
कोणाचं असं राज्य होतं कींवा आहे की त्यांच्या राज्यात पोलीस पैसे घेत नाहीत?
पोलीस हप्ते गोळाकरत नाहीत? हप्ते गोळाकरून मंत्र्यां पर्यतं पोहचवतं नाहीत?
राज्य कोणाचंही असो हे चालतच आहे फक्त मंत्री जर प्रशासनावर वचक असणारा असेल तर अधिकाऱ्यांची हिम्मत होत नाही हा मुळ प्रश्न आहे !
तपास केंद्रीय यंत्रणांकडे गेला की मा. अनिल देशमुख दोषी सापडणार हे नक्की आहेच यातं कोणी शंका घेण्याचं कारणं नाही!
कारणं यंत्रणांचा वापर कसा करायचा ते भाजपाला चांगलं कळतं !
हे महाविकास आघाडी सरकार मधील पक्ष प्रमुख व मंत्र्यांना लवकर नाही कळलं तर डझनभर मंत्री राजीनामा देतील हे सांगायला भविष्यकाराची गरजं पडणार नाही !
एकदा बामसेफ” च्या कॕडर कँपला या म्हणजे सर्व प्रश्ननांची उत्तरं मिळतील”
विचार आणि क्रुती !
बल स्थान ओळखून त्याच्यावर घाला घातला की माणूस राजकारणातून आणि समाजकारणातून उठतो .
याच नितीचा वापर मा. अनिल देशमुख यांच्यावर केला आहे !
स्वतः च्या धडावर जर स्वतःचं डोकं असेल तर प्रत्येकाला ही निती सहज समजेल !
आणि जर नाही समजली तर मग तुम्हाला बामसेफ” चा एक तरी कॕडर कँप करावा लागेल !
पहा ही निती कशी वापरली ते एखाद्या व्यक्ती राजकारणात, अर्थकारणात, समाजकारण हरु शकत नसेल तर त्याच्या वर प्रथम ललना तंत्र वापरूनं नामोहरम करण्याचा प्रयत्न होतो!
तरीही इंगीत साध्य झालं नाही तर त्याची बल स्थाने शोधून त्यावर घाला घातला जातो !
मा. अनिल देशमुख मंत्री झाल्या पासून जिथे कुठे मुलाखती देत आले आहेत तेवढया वेळा त्यांनी अभिमानाने मि स्वच्छ प्रतिमा जपली आहे .
माझ्या वर कोणी तिळा ऐवढा डाग निर्माण होईल असा आरोप करु शकतं नाह हे सांगत आले आहेत !
आजं पर्यंत खरच या माणसाने स्वच्छ राजकारण केलं आहे हे जनता बोलत आहे !
याचं गोष्टी हेरूण विरोधकांनी देशमुख यांच्या वर वार केला आहे !
सर्वसामान्य जनतेला देखील खरं वाटावं म्हणून RSS ने पालन पोषण करून वाढवलेलं,
प्रशासनात पेरलेलं परमबीर सींग नावाचं हत्यार बाहेर काढलं.
आणि बरोबर अनिल देशमुख यांच्या वर डागलं !
येथे मोटे दुख: याचं आहे की स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या मा. शरद पवार यांना हा पेरलेला सनातनी बाँम्ब ओळखता आला नाही की नज़रअंदाज़ केला कळत नाही?
या मुळे राजकारणात डाव – प्रतिडाव तर महत्त्वाचे आहेतच पण दुरदृष्टी देखील महत्त्वाची आहे !
मा. शरद पवार यांना राजकारणं शिकवण्या इतपत आम्ही मोठे नाहीत पण ब्राम्हणी षडयंत्र ओळखण्यात आमचा हातखंडा आहे हे देखील तितकचं सत्य ,।