ब्रेक द चैन नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई ?

प्रतिनिधी:-
कोरोना चा वाढता संसर्ग पाहता ‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे.
कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही.
निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा,
अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
दूसरी कड़े राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही ,अस पोलीस महासंचालक म्हणाले.
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत काल (बुधवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की,
राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही.
मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे.
पुढे बोलताना पोलीस महासंचालक म्हणाले की, या काळात अनेक दुकान बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. परिस्थिति कठिण आहे.
लोक जर बाहेर निघत असतील तर त्यांना आधी विचारलं जावं.
विनाकारण मारहाण किंवा चार्ज लावू नये असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
तसेच ते म्हणाले की, जर कुणी कायद्याची पायमल्ली करत असेल.
सार्वजनिक संपत्तीची नासधुस करत असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई होणार.
आमची विनंती आहे की, आपण आपली स्वतःची काळजी घ्या. मास्क घाला.
पोलीस आपल्या बरोबर आहेत.