मां.उच्च न्यायालय द्वारा सवाल पोलीसप्रमुख स्वत:ला निष्पाप ठरवू शकत नाही ?

मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह याच्या भूमिके वर मे.उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला.
परमबीर यांचे नाव न घेता पोलीस दलाचा प्रमुख केवळ राजकीय वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत होतो,
असे सांगून स्वत:ला निष्पाप दाखवू शकत नाही.
किंबहुना तोही त्याला तितकाच जबाबदार असल्याची टिप्पणी मे. न्यायालयाने केली.
तसेच देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीची व्याप्ती सी.बी.आय.ने वाढवावी आणि यामागील खऱ्या सूत्रधाराला शोधावे,
असे मां.न्यायालयाने म्हटले.
देशमुखांविरोधातील आरोपांच्या प्राथमिक चौकशीच्या आदेशाचा खरा अर्थ हा सी.बी.आय.ने या आरोपांशी संबंधित सगळ्यांच्या भूमिकांचा तपास करायला हवा,
असा असल्याचेही न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने स्पष्ट
केले.
देशमुखांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे.
सुनावणीच्या वेळी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंबाबत परमबीर यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांबाबत प्रामुख्याने टिप्पणी केली.
तसेच या सगळ्या प्रकरणातील परमबीर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
गृहमंत्र्यांनी वाझे यांना पुन्हा सेवेत दाखल करण्याचे आदेश दिले असतील;
परंतु याबाबत अंतिम निर्णयाचे सर्वस्वी अधिकार असतानाही तत्कालीन पोलीस आयुक्तांनी आपल्या या अधिकारांचा वापर न करता राजकीय प्रमुखाच्या आदेशाचे सहजपणे पालन कसे केले? अशी विचारणा माननीय न्यायालयाने केली.