गृहमंत्री, महाराष्ट्र यांच्या हस्ते पोलीस हवालदार इकबाल शेख यांचा गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे सत्कार करण्यात आला का आहे मुख्य कारण?

पुणे – सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणारे पोलीस हवालदार इकबाल अ. रशीद शेख यांनी कमी सेवा कालावधी मध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आजतागायत ,
१० सुवर्णपदक,
०७ रौप्यपदक,
११ कास्यपदक,
०१ राष्ट्रीय पारितोषिक, पोलीस महासंचालक पदक व इतर स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन,
अनेक प्रमाणपत्रे,प्रशस्तिपत्रे पटकावून देशपातळीवर सोलापूर पोलीस दलाचा झेंडा फडकविला आहे.
दिनांक १६/०७/२०२१ रोजी गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य मुख्यालय, पुणे या कार्यालयास सदिच्छा भेट व सत्कार समारंभ करिता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. श्री. दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी आजतागायत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे नूतन गृहमंत्री मा. श्री दिलीप वळसे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव नावलौकिक केल्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.
सदर सत्कार समारंभ वेळी मा. श्री. अतुलचंद्र कुलकर्णी अप्पर पोलीस महासंचालक, मा. श्री मकरंद रानडे विशेष पोलीस महानिरीक्षक,
मा. श्री. रंजनकुमार शर्मा विशेष पोलीस महानिरीक्षक,
मा. श्री. फत्तेसिंग पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,
मा. श्री. प्रवीण साळुंखे,
विशेष पोलीस महानिरीक्षक,
मा. श्री. संभाजी कदम पोलीस अधीक्षक,
श्री. प्रशांत पांडे ,
पोलीस निरीक्षक,
श्री. किरण कुलकर्णी,
श्री जावेद खान,
श्री संदीप शिंदे
पोलीस हवालदार व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अंमलदार उपस्थित होते.