पाहा 73 वर्षीय गोरगरीबांचा कैवारी, दानशूर समाज सेवक कलयाण सुंदरम ची दानवीर गाथा !

IMG-20180324-WA0090

प्रतिनिधी.

रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला तर त्याला कधी कमी लेखू नका।

कदाचित त्या दानशूर वृद्धाचे नाव कल्याणसुंदरम असेल,
ज्याने बक्षीस म्हणून मिळालेले तब्बल 30 कोटी रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दान केले।

हजारो कोटींची कमाई करून समाजासाठी कधी 1-2 कोटीही खर्च न करणाऱ्या सिनेअभिनेत्यांची, क्रिकेट पटूची नावे आपल्याला तोंड पाठ असतात,
पण समाजासाठी 30 कोटी दान करणाऱ्या कल्याण सुंदरमचे नाव मात्र देशातील 1 टक्का लोकांनाही माहित नसावे?

1962 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून देशाला सढळ हाताने मदत करायचं आवाहन केलं।
विशीतील कल्याण सुंदरम त्या भाषणाने इतका प्रेरित झाला कि तडक जाऊन मुख्यमंत्री कामराजना भेटला।
त्याने आपल्या गळ्यातली सोन्याची चेन मदत म्हणून दिली।

नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचा सत्कार केला। पुढे तो मुलगा खूप शिकला। एम.ए. झाला।
लायब्ररी सायन्स मद्धे सुवर्ण पदक विजेता ठरला।
कॉलेजमद्धे लायब्ररीयन म्हणून तब्बल 35 वर्षें नोकरी करूनही कल्याण सुंदरमने एकदाही स्वतःसाठी पगार घेतला नाही।

आपला पगार तो परस्पर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा।
1998 मद्धे 35 वर्षे सेवा करून कल्याण सुंदरम निवृत्त झाले।

मिळालेली *10लाख रुपये पेन्शनही त्यांनी दान केली.
त्यानंतरही ते हॉटेल मध्ये वेटरचं काम करून पैसे मिळवतच राहिले- मुलांच्या मदतीसाठी म्हणून।
इतका अफाट त्याग करणाऱ्या कल्याण सुंदरमच्या कार्याची दखल कधीच कुठल्या सरकारने घेतली नाही!

पण अमेरिका आणि युनोने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ” Man of the Millenium ‘ उपाधी देऊन त्यांचा गौरव केला।

त्यांना अमेरिकेतील एका संस्थेने तब्बल 30 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले।
त्यांनी ती प्रचंड रक्कमही दान करून टाकली।
आजही कल्याण सुंदरम सामाजिक कार्यात गुंतलेले आहेत।

लोकांकडून कधी रद्दी तर कधी जुने कपडे गोळा करून गरजूना वाटतात।
दुर्दैवाने आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेत नाही हे देशाचे दुर्दैव ।
अशा महान व्यक्तीची माहिती सर्वाना कळावी म्हणून तरी प्रत्येकाने हि पोस्ट शेअर करावी!

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT