शहापूर तहसील अलर्ट्स. शहापूर तहसील येथे कारकून म्हणून कामाला असलेला राहुल देसले (भाऊसाहेब) हा जागेचा फेरफार करण्यास टाळाटाळ करत आहे. काय आहे मुख्य कारण?

रिपोर्टर:-
वयोवृद्ध लोकांना रोज बोलावून, चार तास बसवून पुन्हा २ दिवसानानंतरची तारीख देऊन परत बोलावत आहे.
सदर बाब अशी, कि ‘वनपट्टा जागा नावावर करण्याबाबत’ असे परिपत्रक मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांनी काढले होते.
त्याबाबत लक्ष्मण विशे व अन्य दोन व्यक्ती यांच्या नावावर फेरफार करण्याबाबत राहुल देसले बोलावत आहेत.
म्हणजे थोडक्यात काय तर, त्यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकास केराची टोपली दाखवली आहे.
राहुल देसले हा भ्रष्टाचार करण्यात अग्रेसर आहे.
वयोवृद्धांवरही यात तो दया करत नाही..?
सदर बाब हि माहितीसाठी-
मा. जिल्हाधिकारी सो. ठाणे जिल्हा
निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा ,
मा. तहसीलदार, शहापूर तालुका ,
मा. पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध, महाराष्ट्र
यांच्या माहितीसाठी आणि उचित कारवाईसाठी.