स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून १० लाख रुपयांची मदत !

प्रतिनिधी:-
एम.पी.एस.सी. ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील दोन वर्षांपासून मुलाखतच न झाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने ३० जून रोजी आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यालाच एकप्रकारे धक्का बसला.
या घटनेनंतर राज्य सरकारविरोधात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह जनसामान्यांमध्ये संतापाची भावना दिसून आली.
तर, विरोधकांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारला या मुद्य्यावरून धारेवर धरल्याचे दिसून आले.
अधिवेशनातही हा मुद्दा गाजला.
तर, दुसरीकडे स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांच्या सांत्वानासाठी नेते मंडळींची रीघ लागल्याचेही दिसून आले.
मात्र, लोणकर कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत होते.
अखेर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणकर कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.
या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विटद्वारे माहिती दिली असून,
सोबत लोणकर कुटुंबीयांची भेट घेतानाचे व त्यांना मदत देतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत.
एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.”
असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.